सातारा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब यांची माघार.


 

सातारा प्रतिनिधी :शंकर माने

सातारा येथे दि.29 रोजी माननीय श्री शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तालुकावर मीटिंग झाली, मीटिंगच्या आघोदर विद्यमान खासदार आदरणीय श्री श्रीनिवास पाटील साहेब यांनी आदरणीय शरद पवार साहेबांच्या जवळ एकांतात चर्चा करून. मी प्रकृतीच्या कारणास्तव होवू घातलेली लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी अनपेक्षित घोषणा केली.

आदरणीय शरद पवार साहेबांनी मीटिंगसाठी आलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील. तालुकावार प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर व्यक्तिगत थेट संवाद साधून सातारा लोकसभेसाठी कोण उमेदवार असावा याची विचारणा करून आलेल्या कार्यकर्त्यांची मते सविस्तर ऐकून घेवून ती स्वतः लिहून घेतली. आदरणीय शरद पवार साहेब यांचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू असताना #मलाही त्या ठिकाणी माझं मत मांडायची संधी मिळाली.

ADVERTISEMENT

माझ्या दोन मिनिटांच्या मनोगतात मी आदरणीय शरद पवार साहेबांनी सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणुक स्वतः लढावी अशी त्यांना विनंती केली. कारण सातारा जिल्ह्यातील जनतेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेम केलेलं आहे. सातारा जिल्हा, जिल्ह्यातील त्यांच्यावर प्रेम करणारी लाखोंची जनता आणि आदरणीय साहेब हे अतूट नातं आहे. त्यामुळे साहेबांनी स्वतः सातारा लोकसभा निवडणुक लढवावी अशी भावना मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून व्यक्त केली. माझ्यासह उपस्थित असणाऱ्या तालुक्यातील प्रमुख सर्वच कार्यकर्त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांनीच सातारा जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवावी अशी एक मुखी मागणी केली.. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली मते, केलेल्या मागणीचा विचार करून. प्रत्येक तालुक्यातील पक्षाचे प्रमुख नेते यांच्याशी चर्चा करून सर्वांच्या संमतीने पक्षाचा उमेदवार दोन दिवसात जाहीर करतो असे जाहीर केले. आपण त्या उमेदवाराला निवडून आणा असे आवाहन केले. साहेबांची आजची देह बोली प्रचंड विलक्षण वाटत होती. खरं तर तिकीट कोणाला द्यायचे याचा सर्वस्वी सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचाच आहे. परंतु सातारा जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष संवाद साधून उमेदवारी बद्दल त्यांची मते जाणून घेतली हे खरोखरच असंस्मरणीय आहे..

बघुयात आता साहेब काय निर्णय घेतात..!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!