गुंडांच्या अतिक्रमित निवासस्थानांवर तोडक कारवाई केल्याबद्दल पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांसकडून पोलीस अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांचा सत्कार


 

सातारा प्रतिनिधी :शंकर माने

दि.29 मार्च  सातारा शहरातील प्रतापसिंहनगर येथील शासकीय जागेवर काही गुंडांकडून अतिक्रमण करण्यात आले होते. तसेच या गुंडांकडून स्थानिक रहिवाशांना नाहक त्रासही दिला जात होता. बुधवारी सातारा पोलिसांनी सातारा पंचायत समिती आणि खेड ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने येथील अतिक्रमित बांधकामांवर कारवाई केली. यात तब्बल १६ गुंडांच्या बेकायदेशीर निवासस्थानांवर प्रशासनाने तोडक कारवाई केली आहे. जिल्ह्यात कोणतेही बेकायदेशीर कृत्य आणि गुन्हेगारी वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा संदेश या कारवाईने जिल्हा पोलीस आणि प्रशासनाने दिला आहे.

ADVERTISEMENT

या कारवाईबद्दल पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचा सत्कार केला. आम्ही जिल्हा पोलीस आणि प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. तसेच सातारा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पालकमंत्री म्हणून पोलीस आणि प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य नेहमीच राहील, असे याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई यांनी आश्वस्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!