इंद्रायणी नदीवर पूल कोसळला; सहा ठार, अनेक बेपत्ता
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
पुणे, १५ जून – इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल अचानक कोसळून मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २० ते २५ जण वाहून गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संध्याकाळच्या वेळेस पूलावर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची गर्दी होती. पूल कोसळल्याची अचानक घटना घडल्याने सर्वत्र गोंधळ उडाला. अनेक जण पाण्यात वाहून गेले. NDRF, SDRF, पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून रात्रभर बचावकार्य सुरू आहे.
जुना पूल, जुने धोक्याचे इशारे
स्थानिकांनी यापूर्वीही या पुलाची दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्यानंतर पूल अधिकच अस्थिर झाला होता, हे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
मुख्यमंत्र्यांचा तातडीने हस्तक्षेप
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदत व बचावकार्याचे आदेश दिले. त्यांनी जखमींवर तातडीने उपचार करून पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.


