जि.प.प्रा.शाळा नांदगाव येथे स्मार्ट टीव्हीचे वितरण : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल.
धनाजी पवार
भोर (प्रतिनिधी) – राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन व मा. माणिकराव डावरे सर (प्रोफाइव इंजिनिअरिंग) यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नांदगाव (ता. भोर, जि. पुणे) येथे आज स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला. या आधुनिक सुविधेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण प्रणालीचा लाभ होणार असून, शिक्षण अधिक प्रभावी व आकर्षक होईल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक रमेश धर्माजी शेटे व शिक्षक वृंद यांनी व्यक्त केले.
स्मार्ट टीव्हीच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे मा. गणेश चऱ्हाटे यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमात इ. १ लीच्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन अभिनव उपक्रम राबविण्यात आला, तसेच गुलाबाचे फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिंदे परिवार यांच्या वतीने वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले मान्यवर पुढीलप्रमाणे – सौ. भाग्यश्री गणेश चऱ्हाटे (सरपंच, नांदगाव), रावसाहेब चऱ्हाटे (मा. उपसरपंच), ईश्वर चऱ्हाटे, स्वप्नाली संदीप बर्डे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा), अरुण चऱ्हाटे (शाळा व्यवस्थापन समिती तज्ञ मार्गदर्शक), निलेश विठ्ठल कुडले (मा. सरपंच), पांडुरंग सावंत (आपटी विकास सोसायटी सदस्य), विजय चऱ्हाटे, बापू कुडले (प्रहार ता. अध्यक्ष), मिलिंद भातुसे, दिनकर चऱ्हाटे, सोनम चऱ्हाटे, राजू मारणे, शिवाजी खोपडे, किरण कुडले, गणेश चऱ्हाटे, पंढरीनाथ चऱ्हाटे, रघुनाथ मांढरे आणि इतर ग्रामस्थ यांची उपस्थिती लक्षणीय होती.
शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे, सामाजिक संस्थांचे व पालकांचे आभार मानण्यात आले.

