जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्हावी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.


दि.17 सारोळे :-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्हावी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला. गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांची मोठी उपस्थिती लाभली.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगलांजली किडनी संजीवन फाउंडेशनचे विश्वस्त  देविदास देशपांडे,  सतीश मिसर, मेहता प्रेसिंग कंपनी, पुणेचे उद्योजक  तुषार मेहता यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी नवज्योत परिवार ट्रस्टचे अध्यक्ष. संजय लगाडे, सचिव  शितल लगाडे, ग्रामपंचायत न्हावी-३२२ च्या सरपंच शितल सोनवणे, निकिता निगडे रचना सामाजिक संस्था आदी मान्यवर उपस्थित होते.

 

इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे फुगे, तळहात ठसे, पुष्पवृष्टी, औक्षण व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना अंकलीपी, दप्तर, वह्या, चित्रकला वही, रंगपेटी, कंपास, पेन-पेन्सिल, पॅड, कव्हर रोल, पाण्याची बाटली आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप श्री. संजय ताम्हाणे, केंद्रप्रमुख, केंद्र-न्हावी यांच्या हस्ते करण्यात आले.

ADVERTISEMENT

 

विद्यार्थ्यांनी शालेय गीतांवर सादर केलेल्या नृत्यामुळे कार्यक्रमास रंगत आली. शाळा व्यवस्थापन समिती, महिला पालक, व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाविषयी आत्मीयता निर्माण झाली असून, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शाळेत प्रवेश घेतल्याने भोर तालुक्याच्या पूर्व भागात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अनिल चाचर यांनी केले.

सूत्रसंचालन सोनाली बोन्द्रे, तर आभार प्रदर्शन पूनम सोनवणे यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मोरे, अनिल चाचर, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे यांनी विशेष मेहनत घेतली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!