श्रीमंत अर्जुनसिंह पाटणकर यांचा शाही विवाह सोहळा दिमाखात.
प्रतिनिधी शंकर माने:18 डिसेंबर पाटण :- राज्याचे माजी मंत्री श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे नातू व सातारा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांचे सुपूत्र श्रीमंत अर्जुनसिंह सत्यजितसिंह पाटणकर यांचा शाही विवाह सोहळा मंगळवार दि. १७ रोजी म्हावशी शेरी, ता. पाटण येथील भव्य पटांगणावर उभारण्यात आलेल्या शामीनाम्यात आयोजित करण्यात आला होता. या शाही विवाहसोहळ्यासाठी राज्यातील मान्यवरांसह पाटण मतदारसंघातील हजारो जनसमुदायाने उपस्थिती लावून वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले.कै. सौ. उमादेवी पाटणकर व माजी सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांचे नातू आणि सौ. यशस्विनीदेवी पाटणकर व श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांचे ज्येष्ठ सुपूत्र श्रीमंत चि. अर्जुनसिंह सत्यजितसिंह पाटणकर यांचा शुभविवाह, श्रीमती प्रमिलाराजे आणि कै. श्रीमंत फत्तेसिंह महागावंकर-देसाई यांची नात आणि सौ. योगशिलादेवी व हर्षनील फत्तेसिंह महागावंकर-देसाई रा. कोल्हापूर यांची जेष्ठ कन्या चिरंजीवी चि. सौ. का. वैभवीदेवी यांचे बरोबर मंगळवार दि. १७ रोजी पाटण तालुक्यातील म्हावशी-शेरी, पाटण-मणदुरे रोड, ता. पाटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वराना शुभाशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, छत्रपती विक्रमसिंह राजे भोसले, माजी आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. मोहनराव कदम, सुरेशबाबा भोसले, सौ. उत्तरादेवी भोसले, माजी आ. आनंदराव पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रशांत यादव, माजी आ. दीपक पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुनील काटकर, सौ. वैशालीताई शशिकांत शिंदे, प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्राची नरेंद्र पाटील, अनिल देसाई, राजकुमार पाटील, सुनिल खत्री, मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे हिंदूराव पाटील, दिलीप पाटील, शफीभाई शेख, माणिकराव पाटील, सुभाषराव जोशी, चौगुलेसाहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश अण्णासाहेब पाटील आदींसह प्रांताधिकारी सोपानराव टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, नायब तहसीलदार पंडीत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी, पाटण तालुक्यातील सर्व पत्रकार, विविध संस्थांचे पदाधिकारी, सरंपच, चेअरमन, कार्यकर्ते, पाटण विधानसभा मतदार संघातील जनसमुदायाने प्रत्यक्ष भेटून वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले.
यावेळी पाटणकर कुटुंबातील श्रीमंत रामचंद्र पाटणकर, श्रीमंत दीपकसिंह पाटणकर, श्रीमंत प्रतापसिंह पाटणकर, श्रीमंत अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, ऐश्वर्यादेवी पाटणकर, सौ. शिलादेवी पाटणकर, सौ. रेखादेवी पाटणकर, समरजीत सत्यजितसिंह पाटणकर, रघुवीर याज्ञसेन पाटणकर यांच्यासह पाटणकर परिवारातील सदस्यांनी विवाहसोहळ्यासाठी आलेल्या आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व जनसमुदयाचे स्वागत केले.
सरदार घराण्याला साजेसा शाही विवाह सोहळा
पाटणकर सरदार घराणे हे पाटण महालातील ऐतिहासिक घराणे आहे. शिवछत्रपती काळातील पाटण मुलखात पाटणकर घराण्याचा सरदार म्हणून सन्मान होता. या घराण्याने छत्रपतींचे विचार आजच्या पिढी पर्यंत जोपासले आहेत. माजी मंत्री श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर यांनी हा वारसा पुढे चालू ठेवताना तोच वसा त्यांचे सुपुत्र श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर, श्रीमंत याज्ञसेन पाटणकर यांनी पुढे चालू ठेवला आहे. श्रीमंत सत्यजितसिंह पाटणकर यांचा मुलगा श्रीमंत अर्जुनसिंह पाटणकर
मुलाचा शाही विवाह सोहळा साजरा होत असताना या विवाह सोहळ्यास कोणताही डामडौल, बडेजाव पणा न दाखवता विवाह सोहळ्यास येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची खातरजमा स्वतः पाटणकर कुटुंबीय पहात होते. यामुळे हा विवाह सोहळा सरदार घराण्याला साजेसा विवाह सोहळा संपन्न झाला अशा भावना विवाहसोहळ्यासाठी उपस्थीत नागरिकांनी बोलून दाखवल्या.


