वन्य विभाग फॉरेस्ट बामनोली कार्यालयाचा पाच महिने झाले कर्मचाऱ्यांचा पगार नाही
उपसंपादक: दिलीप वाघमारे
बामनोली कार्यालय वनविभाग फॉरेस्ट मधील कर्मचाऱ्यांचा पगार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अद्याप न भरल्याने नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे त्यापैकी काही लोकांचे पगार वेळेवर होतात काही लोक वंचित राहतात त्यामुळे कुटुंब चालवायची महागाईच्या काळात परवड होत आहे या कार्यालयाची दखल वरिष्ठ घेत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची शोषण वाढले आहे या कार्यालयाचे मुख्य ऑफिस वन्यजीव कराडमध्ये आहे या कार्यालयाने वेळेवर दखल घेतली तर कुटुंबाचे महागाईच्या काळात जीवन जगणे असह्य होत आहे काही कुटुंबांना मुलेबाळे कोळी भाडे गाडीचे हप्ते लाईट बिल घरपट्टी पानपट्टी हे भरण्यासाठी शासन लक्ष देईल काय मुख्यमंत्री साहेब सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि या सातारा जिल्ह्यात कामगारांना वाली कोण होईल का त्यांचा पाच महिन्याचा पगार तातडीने शासनाने विना अट देण्यात येऊन गोरगरीब कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे


