पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची संभाजी पुरीगोसावी यांनी घेतली सदिंच्छा भेट …!
प्रतिनिधी ( पुणे जिल्हा )
पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची आज दुपारी पुणे महानगरपालिका कार्यालयामध्ये जयहिंद साहेब असे म्हणत… सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छा भेट घेतली, डॉ. राजेंद्र भोसले कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, ऐतिहासिक शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आहेत, मुंबई,सांगली सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट सेवा दिली, आतापर्यंत विविध जिल्ह्यात विविध पदावर उत्कृंष्ट सेवा, डॉ. भोसले हे २००८ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत, दिनांक 16 मार्च 2024 रोजी त्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे, त्यांनी यापूर्वी मुंबई उपनगरांचे जिल्हाधिकारी होते तसेच सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अहमदनगर जिल्हाधिकारी अशा विविध पदावर त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली.


