डॉ. मिताली सेठी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
संपादक : संभाजी पुरीगोसावी
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागेवर आता नव्याने डॉ. मिताली सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, नूतन जिल्हाधिकारी यापूर्वी राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था ( वनामती ) नागपूर येथील संचालक म्हणून काम पाहत होत्या, डॉ. मिताली सेठी या सन 2017 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत, त्यांच्या आत्तापर्यंत पाच पोस्टिंग झाल्या आहेत, जुलै 2018 ते एप्रिल 2019 या काळात त्या अमरावती येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यानंतर जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या काळात केंद्र सरकारचे असिस्टंट सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे, त्यानंतर ऑगस्ट 2019 ते जुलै 2021 या काळात त्या धारवी येथे सहायक उपविभागीय मॅजिस्टंट प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत होत्या जुलै 2021 ते नोव्हेंबर 2022 या काळात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती, त्यानंतर 2023 पासून त्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था ( वनामती ) नागपूर येथील संचालकपदी कार्यरत होत्या, आज (दि. 26.) राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, यात डॉ. मिताली सेठी यांची नंदुरबार जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे, लवकरच त्या आपला पदभार स्वीकारणार आहेत.