कृष्णा खोरे महामंडळ सदस्य पदी (राज्यमंत्री दर्जा) माणिकराव सोनवलकर
उपसंपादक : दिलीप vaghmare
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांची कृष्णा खोरे महामंडळ सदस्यपदी (राज्यमंत्री दर्जा) नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासन आदेश निगर्मीत करण्यात आले आहेत.
कृष्णा खोरे महामंडळ राज्यमंत्री म्हणून वर्णी लागण्याच्या प्रवासात संतकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष विलासराव नलवडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे. या निवडीचा केंद्रबिंदू आळजापूर ठरले आहे.
आपले मित्र माणिकराव सोनवलकर हे राज्यमंत्री व्हावेत, हे विलासराव नलवडे यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर साकार झाले आहे.
राजकीय वाटचाल ग्रामपंचायत, सोसायटी ते 2014 मध्ये झेडपीचे अध्यक्ष होते. झेडपी अध्यक्ष व्हाया आता कृष्णा खोरे महा मंडळ सदस्य (राज्यमंत्री दर्जा) हा प्रवास झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी माणिकराव सोनवलकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता.
या निवडीमुळे माजी खासदार रणजितशिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील फलटण तालुक्यातील विधानसभा निवडणुकीला मोठे बळ येणार असल्याचे बोलले जात आहे.


