रोटरी क्लब ऑफ भोर राजगड वतीने भाबवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर ,वॉटर ए.टी.एम प्रदान व वृक्षारोपण असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
दि. १० भोर : नेत्र तपासणी शिबिरात 135 रुग्णांची तपासणी करून 90 रुग्णांना चष्मे वाटप तर 35 रुग्ण मोतीबिंद शस्त्रक्रिया निश्चित करण्यात आले.यासाठी एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभले
भाबवडी गावात वॉटर ए.टी.एम. अर्थात शुद्धजल प्रकल्पाचे प्रदान सोहळा संपन्न झाला या प्रकल्पातून भाबवडीतील सर्व लोकांना शुद्ध पाण्याची आणि पाणी वाया न जाता एटीएम द्वारे प्राप्त होण्याची ही अनोखी भेट रोटरी कडून देण्यात आली.
डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रोटे.सतीश खाडे यांच्या हस्ते वॉटर एटीएम चे प्रदान सोहळा संपन्न झाला
आरसीसी क्लब पदग्रहण सोहळा हॅपी ह्विलेजचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर नितीन वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला
आनंदी ग्राम भाबवडी रानजाई आरसीसी क्लब चेअध्यक्ष पदी महादेव बुदगुडे , ,तर आत्माराम गाडे यांना सचिव, व पांडुरंग आंबवले यांना खजिनदार पदी निवडण्यात आले*
यावेळी रोटरी क्लब ऑफ भोर राजगडच्या अध्यक्ष डॉ. रुपाली म्हेत्रे, सचिव अभिजीत बांदल , रोटे .नारायण जाधव ,सुनील थोपटे ,प्रा. रमेश बुदगुडे, प्रा. विनय कुलकर्णी , डॉ .संजय म्हेत्रे ,संपत मळेकर ,केशव शेटे,डॉ.आनंदा कंक इत्यादी रोटरी सदस्य उपस्थित होते .त्याचप्रमाणे भाबवडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
गावातील शेतकरी साठी विविध औषधी तसेच फळझाडांचे वाटप करण्यात आले वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न झाला