भारताचा उद्योग क्षेत्रातला बापमाणूस हरपला, रतन टाटा यांचे निधन ब्रीच कँडी रुग्णालयांत घेतला अखेरचा श्वांस


 

(संभाजी पुरीगोसावी) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

देशांतील आघाडीचे उद्योजक आणि भारतीय उद्योजकांचे प्रेरणास्थान असणारे रतन टाटा यांचे निधंन झाले आहे, देशाचे हे नुकसान कधीही न भरण्यासारखे आहे, चला आपण या थोर उद्योजकांच्या योगदानाबद्दल जाणून घेऊया ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबईतील ब्रीज कॅडी रुग्णालयांत त्यांनी अखेरचा श्वांस घेतला आहे, रतन टाटा एक असे नाव आहे. ज्यांनी अनेक नवतरुणांना उद्योजक होण्यास प्रेरणा दिली. ज्यांनी कित्येक तरुणांच्या बिझनेस कल्पनांना आर्थिक बळ दिलं खरंतर टाटा यांनी नेहमीच आपल्या बिझनेस बरोबर देशाचा सुद्धा विचार केला होता, त्यामुळेच रतन टाटाचे नाव अनेक पुरस्कारांवर सुद्धा कोरले गेले होते, मागीलच वर्षी म्हणजेच 2023 आली महाराष्ट्र सरकारला पहिला वाहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला होता, त्यांच्या निधनांच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षाचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी मुंबईच्या ब्रीज कॅडी रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट वरून आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचे नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतले जात होते. टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमावलं नाही, तर त्यांनी माणसं देखील चांगली जपली होती. कोरोना काळात देशावर मोठे संकट कोसळले होते त्यावेळी रतन टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिले होते. त्यांच्या मदतीमुळे राज्यांतील कोट्यावधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे तर देशभक्त म्हणून पाहिले जायचं त्यांच्याकडूंन प्रचंड सामाजिक कार्य देखील झाले होते. त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरांवरही पोहोचवले होते. त्यामुळे रतन टाटा यांचे नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्व सामान्यांमध्ये आदरांने घेतले जात होते. अशा या दिग्गज उद्योगपतीचे निधन झाल्याने देशभरांत हळहळ व्यक्त केली जात आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!