न्हावी स. नं. १५ मधील ओंकार हराळे यांची यशस्वी झेप ; भालचंद्र जगताप यांच्याकडून यथोचित सत्कार.
दि.१३ सारोळे : न्हावी गावचे सुपुत्र ओंकार सुरेश हराळे यांची नुकतीच राज्य उत्पादन शुल्क जवान (स्टेट एक्ससाईज कॉन्स्टेबल) पदी निवड झाली. महाराष्ट्र राज्य सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या शुभहस्ते ओंकारचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी न्हावीचे माजी उपसरपंच – ज्येष्ठ व्यक्तिमत्व सूर्यकांत जगताप, यशस्वी उद्योजक तुषार जगताप, युवा नेते विश्वजीत उर्फ धनंजय जगताप, गावचे मा. सरपंच अजित शिंदे, अल्फा लावल चे युनियन लिडर राहुल जगताप, उद्योजक पै. तुषार खोपडे आणि अजिंक्य जगताप, निलेश सोनवणे, बँकेतील कर्मचारी अक्षय जगताप, जीवन धुमाळ, अभिजीत कोंडे, वैभव सोनवणे, सुमित सोनवणे, कॅप्सूल कंपनीतील अधिकारी अमोल सोनवणे, शिवाजी सोनवणे आणि भालचंद्र जगताप विचारमंचचे बहुतांशी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शुभेच्छा देताना भालचंद्र जगताप यांनी सांगितले, ओंकरची घरची परिस्थिती हालाखीची असताना व ग्रामीण भागात शालेय शिक्षण होऊन सुद्धा त्याने उच्च अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बांधली असून त्या दिशेने त्याने हे एक यशस्वी पाऊल टाकले आहे. न्हावी पंचक्रोशी मध्ये ओंकारचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे सांगून इतर तरुणांना सुद्धा सरळ सेवा भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करा असे आवाहन करून बँकेतर्फे उच्च शिक्षणासाठी तरुणांना मदत करण्याचे आश्वासन दिले व शिक्षणासाठी सर्वतोपरी वैयक्तिक मदत आणि मार्गदर्शन करू असे सांगितले.


