भोर पंचायत समिती आरक्षणात एससी-एसटी प्रवर्ग वगळल्याबाबत प्रहार जनशक्ती भोर अध्यक्ष अजय कांबळे यांची हरकत
भोर (प्रतिनिधी) : भोर पंचायत समिती निवडणुकीत अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गांना आरक्षण न दिल्याने सामाजिक न्यायाचा भंग झाल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष भोर अध्यक्ष न्हावी येथील नागरिक अजय रुपचंद कांबळे यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी भोर यांच्याकडे कायदेशीर हरकतपत्र दाखल केले आहे.
कांबळे यांनी पंचायत समिती आरक्षणात ६ गण सर्वसाधारण व २ गण मागासवर्गीय ठेवून एससी-एसटी प्रवर्गांना वगळल्याबाबत आक्षेप घेतला आहे. त्यांनी आरक्षण आदेश स्थगित करून लोकसंख्येच्या प्रमाणात सुधारित आरक्षण करण्याची मागणी केली आहे.
हरकतपत्राची प्रत जिल्हाधिकारी पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आणि गटविकास अधिकारी भोर यांनाही सादर करण्यात आली आहे.