धांगवडी गावच्या हद्दीत कोयत्याने तरुणावर हल्ला.
भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगत असणाऱ्या धांगवडी गावच्या हद्दीत अल्पवयीन तरुणाने शिरवळ(ता. खंडाळा)या तरुणाने किरकोळ वादातून केंजळ (ता.भोर) येथील तरुणावर कोयत्याने वार केले आहे. याबाबत ओम सुभाष येवले वय (२०वर्ष ) यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे धांगवडी ता.भोर जि.पुणे गावच्या हद्दीत ओम येवले उभा असताना त्यांच्या ओळखीचा अल्पवयीन तरुण (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा ) या तरुणाने येवले या तरुणाकडे रागात पाहतो म्हणून शिवीगाळ,दमदाटी केली. शिवीगाळ करू नको असे बोलले असता त्याने आणखीन शिवीगाळ करू लागला. यावेळी ओम याचा मावस भाऊ तेजस हा मध्यस्थी करून भांडणे सोडवत असताना सुदर्शन याने कॅन्टींन च्या बाजूने लोखंडी कोयता घेऊन येऊन ओम येवले या तरुणाच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली. त्याच्या हातातील कोयता मावस भाऊ तेजस आणि मित्रांनी काढून घेतला. त्यानंतर परत शिवीगाळ दमदाटी करत तेथून निघून गेला.
म्हणून याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी ओम सुभाष येवले यांनी अल्पवयीन तरुणावर कायदेशीर फिर्याद दाखल केले आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गशाखाली पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.