शनिवारी शाळेच्या वेळेत बदल करावा – खा. नितीन पाटील
सातारा संपादक दिलीप वाघमारे
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १.२० पर्यंत वर्ग भरतात. मात्र, विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार ही वेळ बदलणे गरजेचे असल्याचे खासदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.
नितीन पाटील यांनी स्पष्ट केले की, शनिवारी अनेक शाळांमध्ये दप्तरविना शाळा, योगासने, कवायती यांसारखे व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम घेतले जातात. पण शाळा १.२० वाजता सुटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक पालक शेती किंवा कामानिमित्त घराबाहेर असतात, त्यामुळे मुलांना दुपारी न्यायला अडचण येते.
त्यामुळे शनिवारची शाळा सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत घ्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
शनिवारची शाळेची वेळ विद्यार्थी व पालक यांच्या दृष्टीने गैरसोयीची आहे. जिल्हा परिषदेने तत्काळ बदल करावा. चंद्रकांत जगदाळे, युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), माण


