कापूरहोळ-सासवड रस्त्यावर डांबर टाकून उरकाउरकी; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीवर रिपब्लिकन सेनेचा संताप


मंगेश पवार

कापूरहोळ (ता. भोर) – कापूरहोळ ते सासवड मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरंदर विभागाकडून अत्यंत हलगर्जीपणे सुरू आहे. डांबराची चिखलासारखी गोळे करून, कोणतीही साफसफाई न करता थेट खड्ड्यांमध्ये टाकण्यात आले. ना पृष्ठभागाची तयारी, ना रोलरचा वापर – केवळ औपचारिकता पार पाडल्यासारखे कामगारांनी घाईघाईत काम उरकले आणि तिथून निघून गेले.

ADVERTISEMENT

 

या निष्काळजी कामामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेना भोर तालुका विधानसभा अध्यक्ष किशोर अमोलिक यांनी केली आहे.

 

अमोलिक यांनी इशारा दिला की, “सरकारी निधीचा अपव्यय करून असे उरकाउरकीचे काम करणाऱ्यांना वेळेत रोखले नाही, तर हे चुकीचे काम सामान्य जनतेच्या जीवावर उठेल. आम्ही प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करणार असून, आंदोलनाचा मार्ग अवलंबायलाही मागेपुढे पाहणार नाही.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!