विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख! कुलदीप कोंडे यांच्या हस्ते सायकल वाटप सोहळा उत्साहात पार
मंगेश पवार
नसरापूर :- ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटचालीत मदत व्हावी आणि त्यांच्या आकांक्षांना दिशा मिळावी या हेतूने शिवसेना भोर, राजगड, मुळशी तालुका, भोर–राजगड शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा प्रतिष्ठान, कुलदीप कोंडे युवा मंच तसेच सिंहगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रयत्नातून विधानपरिषद उपसभापती डॉ. निलमताई गोर्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नसरापूर येथे तब्बल 500 सायकलींचे वितरण करण्यात आले.
“गावाकडील विद्यार्थी हेच देशाचा कणा आहेत. त्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि त्यांचा प्रवास कधी थांबू नये, म्हणून या उपक्रमाची कल्पना साकारली. प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हेच आमच्यासाठी खरे यश आहे. पुढेही अशा उपक्रमांतून शिक्षण क्षेत्राला हातभार लावत राहू.”
ADVERTISEMENTप्रमुख संयोजक कुलदीप कोंडे
सोहळ्यास शिवसेना जिल्हाअध्यक्ष रमेश कोंडे,माजी उपसभापती अमोल पांगारे, निलेश घारे, युवा नेते सचिन बांदल, दीपक करंजावणे, भोर तालुका युवा सेनेचे अध्यक्ष स्वप्निल गाडे, प्रमोद शिळीमकर, सूरज जगताप,विकास चव्हाण, हर्षद बोबडे, गणेश धुमाळ, तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, भोर–राजगड प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे वाटप नसून.गरजू विद्यार्थ्यांना जाण्यायेण्यासाठी हे उपयोगी पडेल.तसेच भोंगवली कामथडी गणात सुद्धा लवकरच वाटप केले जाणार आहे .कारी गण,भोलावडे गणात टप्पा टप्प्याने वाटप केले जाईल.
हर्षद बोबडे सर सामाजिक कार्यकर्ते