महाविकास आघाडी उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांचा महामार्ग लगत असणाऱ्या गावात गावाभेट दौरा


भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील महामार्गलगत हरिश्चंद्री, खडकी, उंबरे, करंदी खे.बा. देगाव, कांबरे खे.बा. साळावडे, केळवडे, कांजळे, वरवे, शिवरे, खोपी, कासुर्डी खे.बा. कुसगांव, रांजे, ससेवाडी, शिंदेवाडी, वेळू या गावातील मतदार बंधू-भगिनीं यांच्या सोबत गाव भेट दौरा निमित्त भेट घेऊन सवांद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले याभागातील सर्वात महत्वाचा प्रश्न रिंग रोडचा होता चुकीच्या सर्वेक्षणमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी त्यामध्ये जात होत्या त्या संदर्भात रिंगरोड विरोधी कृती समितीच्या माध्यमातून उभारलेल्या लढ्याला मिळालेल्या यशामुळे केळवडे, कांजळे, खोपी, कांबरे, नायगाव ही गावे रिंग रोड मधून वगळण्यात आली असून या पाच गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्या वरील रिंगरोड आरक्षणाचे शिक्के कमी करून शेतकरी बांधवांना मोफत रिंग रोड मुक्त सातबाऱ्याचे वाटप केले.

वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, खेड-शिवापूर व कासुर्डी या भागातील कंपन्यांमध्ये वाढती विजेचे मागणी पाहता व कंपनी व्यवस्थापकांना येणा-या विद्युत विषयक आडचणी जाणून घेऊन नवीन सबस्टेशन उभारणी करून त्या सोडविण्यासाठी MSEB चे कार्यकारी अभियंता यांच्या समवेत बैठक घेऊन तोही प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केला.

त्याचबरोबर कोविड संक्रमन काळात ससेवाडी येथे ४८ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर उभारून कोविड पेशंटला रेमडीसीवर इंजेक्शनसह उपचार सुविधा पुरविण्यात आल्या

विकास कामांच्या बाबतीत रा.मा. ४ ते शिवरे रस्ता करणे १ कोटी ६ लक्ष, शिवगंगा नदीवरील पुलाचे काम १ कोटी ५० लक्ष, कुसगांव खोपी कांजळे साळावडे ते वरवे बु.पुलाचे काम करणे ५ कोटी ६२ लक्ष, केळवडे ते बनेश्वर रस्ता ५५ लक्ष, वरवे जोड रस्ता ८५ लक्ष, देगांव राव्हेकर वस्ती रस्ता करणे ७० लक्ष, देगांव मधील बंधारे ६५ लक्ष, खडकी उंबरे रस्ता ४४ लक्ष, वेळू येथे साकव ७० लक्ष, वेळू, कुसगांव, कुरुंगवडी नायगाव, देगांव, कामथडी नळपाणी पुरवठा योजना करणे यासाठी कोट्यावधी निधी, हरिश्चंद्र येथे को.प.बंधारा बांधणे २ कोटी ८० लक्ष, हरिश्चंद्री ते निगडे फाटा रस्ता करणे ४ कोटी ८० लक्ष अशी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली, त्याचप्रमाणे PMRDA अंतर्गत येणारे रस्ते यासाठी निधी अनेक घरकुले मंजूर करून लाभार्थीना अनुदान मिळवून देण्याचे काम करता आले, या केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून आपण मतदार बंधू भगिनी यांच्या पर्यंत पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, शैलेश सोनवणे, आबासाहेब यादव, पोपटराव सुके, शिवाजी नाना कोंडे, अशोक आबा शेलार, माऊली पांगारे, अशोक वाडकर, हिरामण पांगारे, धनंजय वाडकर, लहुनाना शेलार, रोहन बाठे, आदित्य बोरगे, गणेश खुटवड, रणजित बोरगे, विद्याताई यादव, दुर्गा चोरघे, रुक्मिणीताई पवार, शुभांगी गायकर, राणीताई मांढरे, नाना साळुंके, दशरथ गोळे, हनुमंत शिंदे, दत्ता कोंडे, शरद जाधव, आनंदा खुडे, विठ्ठल खाटपे, निलेश भोरडे बंटी कोंडे, लाला कोंडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ महिला भगिनी व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!