चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन गटारामध्ये पलटी….
कार्यकारी संपादक:सागर खुडे
दि. १३ कापूरहोळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील किकवी गावचे हद्दीत चारचाकी वाहन मुख्य रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट गटरामध्ये पलटी झाले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील किकवी हद्दीत हा चारचाकीचा अपघात घडला असून सँन्ट्रो वाहन क्रमांक
MH12DM9677 (एम.एच१२डी एम ९६७७) असुन ही गाडी साताऱ्यावरून पुणेचे दिशेने निघाली असताना मुख्य महामार्गावरून थेट गटरामध्ये जाऊन पलटी झाली,आणि हा अपघात झाल्याची घटना दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३वाजण्याच्या सुमारास किकवी गावाच्या हद्दीत घडली असुन या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नसून त्या वाहनामध्ये एकूण पाच प्रवाशी होते,त्यातील दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून किकवी येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा अपघात झाला असता त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती तर स्थानिक लोकांनी तात्काळ जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज नानिजधाम या अँब्युलन्स वरील डायवर अहिरे यांना कॉल करताच क्षणाचा विलंब न लावता अपघातग्रस्तांना जवळील दवाखान्यामध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
अद्यापही अपघाताचे मूळ कारण समजू शकले नाही.

 
			

 
					 
							 
							