शिवकालीन ऐतिहासिक महिमा असलेल्या श्री अमृतेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न.


कार्यकारी संपादक: सागर खुडे

15 भोर : शिवकालीन ऐतिहासिक महिमा असलेल्या श्री अमृतेश्वर मंदिर देवस्थान येथे त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली

८४ गुंजण मावळ खोऱ्यातील आराध्य दैवत असलेल्या मोहरी बु येथे हा सोहळा संपन्न होत आहे

सकाळी पहाटे 5 वाजता अमृतेश्वराची आरती होते.

येथील युवक आजच्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचा आयोजन करतात,तसेच संध्याकाळी मोहरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात.

ADVERTISEMENT

 

संध्याकाळी ७ ते ११ भजनाचा कार्यक्रम होतो.त्याच बरोबर मंदिराला विघुत रोषणाई करून ,फटाक्याची आतषबाजी केली जाते‌ त्यानंतर श्री अमृतेश्वराच्या व हर हर महादेव जयघोषात पालखीची प्रदक्षिणा मंदिराला घालण्यात येते. त्यानंतर रात्री १२वाजता मंदिरासमोरील दिपमाळ प्रज्वलित करुन त्रिपुरारी पोर्णिमेच्या कार्यक्रमाची सांगता होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!