चैन सोनं साखळी चोरी करणाऱ्या गुन्ह्यामध्ये हवे असणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या :- कोथरूड पोलिसांची दमदार कामगिरी.
संभाजी पुरीगोसावी
दि. १४ पुणे : कोथरूड पोलीस ठाण्यांच्या परिसरांमध्ये सकाळी फिरायला निघालेल्या महिलांना हेरुन करून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांना कोथरूड पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे, सदर ताब्यांत असणाऱ्या आरोपींकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील एक आरोपी हा परराज्यांतील असून त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, राकेश गोकुळ राठोड ( वय 21 रा. सुप्रीम कॉलनी एम.आय.डी.सी रोड जळगांव ) आदित्य कुंडलिक माझिरे (वय 19 रा. मु.पो. रावडे ता. मुळशी जि. पुणे ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, यातील राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी,घोरफोडी दरोडयासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, मध्य प्रदेशातील भारवकुवा पोलीस ठाण्यात त्याच्यावर वाहन चोरी जैन चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडूंन राठोड चा शोध घेण्यात आला होता, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून कोथरूड मधील उजवी भुसारी कॉलनी परिसरांत पहाटेच्या सुमारांस फिरण्यासाठी निघालेल्या ज्येष्ठ वय वृध्दा महिलांच्या गळ्यातील सोन साखळी दोघांनी हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली होती, त्या अनुषंगाने कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. बालाजी सानप ज्ञानेश्वर मुळे आकाश वाल्मिकी विष्णू राठोड यांच्या पथकांने आरोपींच्या मार्गावर होते, तात्रिक तपासावरून गुन्ह्यातील राठोड आणि माझिरे यांनी केल्याचे निष्पन्न करून पोलिसांनी दोघांना ताब्यांत घेतले त्यांच्याकडूंन केलेल्या तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली, कोथरूड पोलिसांनी त्यांच्याकडूंन सोन,साखळी मंगळसूत्र मोबाईल दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करून कोथरूड पोलीस ठाणेकडील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत, सदरची कामगिरी अमितेशकुमार पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त संभाजी कदम पोलीस उपायुक्त परिमंडळ – 3 सरदार पाटील सहा: पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने विक्रमसिंह कदम पोलीस गुन्हे तपास पथक प्रभारी स.पो.नि.बालाजी सानप पो.उपनि. बसवराज माळी अंमलदार अजिनाथ चौधर ज्ञानेश्वर मुळे संजय दहिभाते अजय शिर्के मंगेश शेळके शरद राऊत विष्णू राठोड आकाश वाल्मिकी आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, कोथरूड पोलिसांच्या दमदार कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून अभिनंदन होत आहे,


