निर्भया पथकाच्या मार्फत कामथडी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन….


कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

दि. १३ नसरापूर : मौजे कामथडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे इ.५ते१०वी मधील मुलामुलींना तसेच महीलावर्ग यांना कायदेविषयक मार्गदर्शन करून गुड टच – बॅड टच,मोटीवेशनल स्पीच,निर्भया पथकासंदर्भात जनजागृती, पोक्सो तसेच सायबर क्राईम व बालविवाह या संदर्भात माहिती देण्यासाठी पुणे ग्रामीण विभाग निर्भया पथक राजगड पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस हवालदार सौ.प्रमिला निकम  यांनी जनजागृती शिबिरातून मार्गदर्शन करीत प्रबोधन केले. तसेच डायल क्रमांक ११२संदर्भात माहिती दिली.मुळात महिलांचे जीवन हे पूर्वीप्रमाणे फक्त “चूल आणि मूल” या उक्तीप्रमाणे सीमित राहिले नसून आज महागाईच्या काळात त्यांनाही आपल्या कुटुंबांमध्ये मुलभुल गरजांसाठी झगडावे लागत आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभ्या राहत पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अर्थार्जन करण्यामध्ये आपल योगदान अर्पण करावं लागत आहे तसेच अहिंसा आणि धाकडपणामुक्त वातावरणात त्यांना त्यांचे मन आणि शरीर या दोन्हीच्या बाबतीत मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी आज महिलांना हवी आहे. परंतू महिला आणि मुलींची छेडछाड होऊ नये, त्यांच्याबद्दल कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निर्भया पथकाची खऱ्या अर्थाने स्थापना झालेली आहे.महिलांना नोकरी व्यवसायनिमित्त रात्री अपरात्री उशिरा कामावरून घरी किंवा घरातून कामाच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. परंतू दरवेळी त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ,वडील, किंवा नवरा सोबत नसतात आणि असतीलही अस शक्य नाही. त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढावल्यास स्त्रीला स्वत:ची सुरक्षा स्वत:चं करावी लागते.

ADVERTISEMENT

आणि अशा सर्व महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम होणे ही काळाची नितांत गरज आहे.कारण आज देशभरात स्त्रियांवरील होणारे लैंगिक अत्याचारांच्या घटना वारंवार आपल्याला ऐकण्यात येतं आहे.आणि त्यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी निर्भया पथक आपल्या मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन करीत आहे.महिलांना व त्यांचे मुला मुलींना अडीअडचणी आल्यास आमचा संपर्क क्रमांक देऊन आमचेशी संपर्क साधण्याच्या सूचना आणि आवाहन पुणे ग्रामीण विभाग राजगड पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस हवालदार सौ.प्रमिला निकम मॅडम यांनी केले.

प्रसंगींच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकवर्गासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!