जळगांव जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या, महेश शर्मा नियंत्रण कक्षात रवागणी :- पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
जळगांव चे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील 4 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत, दरम्यान हिवाळी अधिवेशनात पाईप चोरी प्रकरणावरून आ. राजूमामा भोळे यांनी पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित केला होता, मुख्य संशयितांचे नाव चुकवून त्यांना पाठीशी घातले होते, त्याच पार्श्वभूमीवर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या बदलीच्या हालचाल सुरू होती, अखेर सोमवारी महेश शर्मा यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, याव्यतिरिक्त सायबर पोलीस ठाणेचे प्रभारी निलेश गायकवाड यांची एंरडोल पोलीस ठाणेत तर एंरडोल चे प्रभारी सतीश गोराडे यांची सायबर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, सतीश गोराडे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा ही अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे, तात्काळ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणेत हजर राहून आपला पदभार स्वीकारून मुख्यालयाकडे तसा अहवाल सादर करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे,