खेड शिवापूरमध्ये १७ जणांवर जुगार खेळताना कारवाई, २८ हजार ३०० रुपयांची रोकड जप्त
खेड शिवापूर(प्रतिनिधी): खेड शिवापूर येथील हॉटेल गार्गी शेजारील एका इमारतीतील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये सुरू असलेल्या तिन पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकून १७ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या छाप्यात एकूण २८,३०० रुपयांची रोकड आणि पत्ते जप्त करण्यात आले आहेत.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर २४५/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपी विविध ठिकाणांहून आलेले असून, सर्वजण तिन पत्त्याच्या जुगारात गुंतलेले होते.
आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1. मकरंद मारुती मेदने, वय ४०, रा. वडगाव मावळ, ता. मावळ, जि. पुणे
2. अमित सुभाष चिकुदरे, वय ३२, रा. वडगाव मावळ, ता. मावळ, जि. पुणे
3. वैभव लहाणु थोपटे, वय ३८, रा. नवले ब्रिज, पुणे
4. ज्ञानेश्वर गंगाधर बालपांडे, वय ४२, रा. पुणे
5. विठ्ठल दत्तात्रय दारवटकर, वय ५५, रा. पुणे
6. विनायक विठ्ठल चित्ते, वय ३०, रा. पुणे
7. गोकुळ मारुती धोबी, वय ३५, रा. पुणे
8. अनिल रामभाऊ माने, वय ३६, रा. पुणे
9. फारूक शेख इलियास, वय ४५, रा. पुणे
10. लखन लक्ष्मण बसटे, वय २९, रा. पुणे
11. राजकुमार हरिभाऊ शिखरे, वय ४०, रा. पुणे
12. सलीम हाजी मुराद शहा, वय ४८, रा. पुणे
13. शब्बीर बशीर शेख, वय ३३, रा. पुणे
14. योगेश राजू मिस्त्रा, वय ३५, रा. पुणे
15. राकेश मनोज राऊत, वय २८, रा. पुणे
16. पंकज दिलीप गायकवाड, वय ३१, रा. पुणे
17. अमित अर्जुन राऊत, वय ३०, रा. पुणे
प्रत्येक आरोपीकडून १००० ते ३००० रुपयांदरम्यान रोख रक्कम व पत्ते मिळाले. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.सई.अजित पाटील पुढील तपास करीत आहे.


