चोरांकडून जप्त 65 मोबाईल सहकारनगर पोलिसांकडून फिर्यादीना परत. पोलीस आयुक्तांकडून पोलिसांचे कौतुक,


 

उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

आंतरराज्यांत टोळीकडून हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 18 लाख 82 हजार 479 रुपयांचे 65 मोबाईल आदरणीय पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते फिर्यादीना परत करण्यात आले आहेत. सदरची दमदार कारवाई ही सहकारनगर पोलिसांनी केली आहे. दिनांक. 14 जुलै रोजी पोलीस ठाणेच्या हद्दीतील चव्हाणनगर कमानी शेजारी असलेल्या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी मोबाईल चोरून नेले होते. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोमीन मुन्ना देवान (वय 36) रा. बिरता चौक, बसननगर बिहार) अरुण किशोरी सहा. (वय 52) रा. वार्ड नंबर 17 मोतीहारी मठिया डीह बिहार) आणि शमसाद आलम सरजउल अन्सारी (वय 36) रा.अठमुहाण मोताहारी बिहार) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. यावेळी आरोपींकडून सहकारनगर पोलिसांनी जवळपास 18 लाख 82 हजार 479 रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 65 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सदर मोबाईल हे पोलीस आयुक्तांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!