भोर तालुक्यातील लाल मातीसाठी शिव प्रहार संघटना आक्रमक : कारवाईसाठी प्रशासनाला दिले निवेदन.


मुख्यसंपादक: मंगेश पवार

दि. 24सारोळे : भोर तालुक्यात अनेक ठिकाणी माती उत्खनन होत आहे. शेतात, पडीक जमिनीवरती अक्षरशः शासनाने दिलेल्या नियम अटी चे उल्लंगन होत आहे. रात्रीच्या वेळेला माती अवैधपणे काढली जात असली तरी महसूल विभागाला त्याचा पत्ता लागत नसल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला जातो.

पुणे-सातारा महामार्गावरती कंपनी, हॉटेल,पेट्रोल पंप बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात( माती,)मुरूम लागत आहे.

त्यामुळे भोर तालुक्यातील शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी भोर तालुक्यातील तहसीलदार आणि प्रांतसाहेब यांना अवैध लाल माती वाहतूक करणारे माफीयांवर कार्यवाही करणे बाबत निवेदन दिले आहे.

 

शिव प्रहार संघटनेने निवेदनामध्ये सांगितले आहे की, भोर तालुक्यातून अवैध माती वाहतुक करणा-याकडून पर्यावरणाची हाणी होत आहे. तसेच जमीनीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असून मोठ्या प्रमाणात मातीची वाहतूक होत आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत,भोर तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात मातीची वाहतुक करीत असणारे इसमांवरती तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे कारण भोर तालुक्यातील जमीनी हया माती वाहतुक केल्यानंतर उर्वरीत जमीनी हया नापीक होवू लागल्या आहेत.अवैध माती वाहतुक करणारे व्यवसायीक है जोमात असून अशा प्रकारे स्वतःच्या फायदयासाठी व्यवसाय करणारे व्यवसायीक महसूल विभागाचा लाखो रूपयाचा महसूल बुडवून राजरोसपणे भोर तालुक्यातील माती व्यवसाय करीत आहेत.

तरी या व्यवसायीकांकडे महसूल विभाग जाणून बुजुन दुर्लक्ष करीत असलेले पाहायला मिळत आहे

 

काही व्यवसायीकानी तर महसूल विभागाकडून कमी प्रमाणात ब्रास मातीचा परवाना काडतात प्रत्यक्ष त्यापेक्षा जास्त ब्रास माती वाहतुक होत आहे,त्यामुळे शासनाची फसवणूक मोठया प्रमाणात होत आहे. ज्याठिकाणी माती भरणी करत आहेत त्या ठिकाणी देखील पंचनामा महसूल विभागातील कर्मचारी का करीत नाहीत ज्या गावच्या हद्‌दीतून माती वाहतुक होत आहे त्या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करणे गरजेचे आहे.

 

तसेच येणा-या २४ जानेवारी २०२५ पर्यंत जर माती वाहतुक करण्यावरती शासन नियमाप्रमाणे कार्यवाही झाली नाही तर तहसिल कार्यालय भोर याच्या कार्यालया समोर दि २६ जानेवारी २०२५ रोजी शिव प्रहार प्रतिष्ठानच्या वतीने जन आदोलन छेडण्यात येईल आणि होणा-या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

 

तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना वकील गुलाब उर्फ नवनाथ पारखे, महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार, रामचंद्र शंकर कोंढाळकर, तुकाराम रामचंद्र कोंडे, रामचंद्र शंकर युवरे, सावरदरे गावचे युवा सरपंच गणेश साळुंखे यांनी भोरचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!