वाईसह पुण्यातील १२ जणांना १९ लाखांना गंडा.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
१९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ऑगष्ट २०२३ ते मे २०२४ पर्यंत सुरेश नरसीदास चंदाराणा, वय ७०, रा. एमआयडीसी वाई व ट्रॅव्हल्स फॅक्टरीच्या मालकिन प्रिती सिध्दार्थ, रा. उत्तरप्रदेश यांनी यशवंत केरबा ओतारी, किशोर शंकर अभ्यंकर, जयवंत दत्तु जावळीकर, अनिल मोरेश्वर देव, अरविंद पांडुरंग कोल्हापुरे, विनय अरविंद पोरे, राजेंद्र रामचंद्र धुमाळ, सौ गीता अरविंद कोठावळे सर्व रा. वाई व अनिल वसंत जोशी, नरहरी वासुदेव खटावकर, कुंडलिक बाबुराव जंगळे, अविनाश कमलाकर मेढेकर, सौ विद्या नाईक सर्व रा. पुणे यांचेकडुन परदेशी फिरायला जाणेसाठी म्हणुन १९ लाख रुपये घेवुन फिरायला न नेता फसवणुक केली. याप्रकरणी यशवंत ओतारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण करत आहेत.

 
			

 
					 
							 
							