अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू.
मंगेश पवार
कापूरहोळ ते सासवड रोडवर दिवळे गावच्या हद्दीत दुचाकी वरून चाललेल्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात मनीष समगे या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवळे गावच्या हद्दीत सासवड ते दिवळे रोडवर फिर्यादी माधव कापसे यांच्या हॉटेल वरील कामगार मनीष एकनाथ समगे हा त्याच्या ताब्यातील MH १२ MR १४५२ त्या मोटार सायकलवरून केतकावळे ते दिवळे असा येत असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनाची त्याच्या दुचाकीला समोरासमोर धडक बसली. यात संतोष समगे रा. कुंभोशी ता. पुरंदर जि.पुणे सध्या रा. दिवळे याचा मृत्यू झाला. त्यामुळे मोटरसायकलचे नुकसानास कारणीभूत आणि जखमीस मदत न करता वाहन घेऊन पळून गेल्याने फिर्यादी माधव दत्तात्रय कापसे यांनी त्याच्या विरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्याचा अधिक तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना लडकत करीत आहे.

 
			

 
					 
							 
							