भरधाव एसटी बसची दुचाकीला धडक ! दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू.
नसरापूर : सातारा ते पुणे महामार्गावर एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१६/५/२४ रोजी सायंकाळी सहा वाजायच्या सुमारास केळवडे ता.भोर जि. पुणे गावचे हद्दीत हॉटेल विशाल प्युअर व्हेज जवळ सातारा ते पुणे महामार्गावर वसीम नईम सय्यद वय ३७ वर्ष यांच्या दुचाकी एम एच 14 जीझेड ०८१४ वरून साताऱ्याकडून पुणे बाजूला जात असताना एसटी नंबर एम एच २० डीएला ३६७८ हिच्या वरील चालक पांडुरंग रघुनाथ ढाणे वय ३६ वर्ष रा पो निमणी ता तासगाव जि सांगली याने त्याच्या ताब्यात ती एसटी बस निष्काळजीने चालवून, हयगयीने व भरधाव वेगाने चालवून वसीम सय्यद यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद समीर हनीफ सय्यद वय ३८ वर्ष रा निगडी पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा गायकवाड करीत आहेत.

 
			

 
					 
							 
							