शिंदेवाडी येथून अज्ञान चोरट्याने मोटरसायकल चोरली .
पुणे सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील शिंदेवाडी गावातील फॉरेस्ट ऑफिसच्या गेट समोरून मोटर सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. २५/५/२४ रोजी रात्री ११ वाजता ते दि.२६/५/२४ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान शिंदेवाडी ता.भोर जि. पुणे गावच्या हद्दीतील असणाऱ्या फॉरेस्ट ऑफिसच्या गेटच्या समोर पार्किंग केलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक एम एच १२ एफ टी ७५५७ ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. म्हणून याबाबत रामेश्वर सुभाष नरवडे यांनी राजगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


