महामानवाऺच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न.
शिरवळ प्रतिनिधी
फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, खंडाळा यांचे वतीने महामानऺवाच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विचारांचा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रसिद्ध सप्तखंजिरीवादक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज (अकोट, जि.अकोला) यांच्या प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम शनिवार दि.२५/५/२०२४ रोजी कै.सऺतोबा कबुले हाॅल, शिरवळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष महादेव कांबळे,प्रा.रोहिदास जाधव, डॉ.विजय शिंदे, शौकत शेख, संतोष तांबे व दादासाहेब खुंटे यांच्या हस्ते मा.सत्यपाल महाराज यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खंडाळा तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व खंडाळा तालुक्यातील पहिले सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाल्याबद्दल शिरवळचे सुपुत्र मा.उदयदादा कबुले यांचा तसेच पंचायत समिती, खंडाळाचे सभापती म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मा.राजेऺद्र आण्णा तांबे यांचा तसेच ग्रामपंचायत शिरवळच्या माध्यमातून शिरवळमध्ये करत असलेल्या विकासकामाबद्दल सरपऺच मा.रविराज दुधगावकर, उपसरपंच मा.ताहेरभाई काझी व सर्व सन्माननीय सदस्य यांचा शिरवळ भुषण म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल अनुक्रमे डॉ. सुदर्शन गोरे, शिव महोत्सव अन्नछत्र मंडळ, शिरवळ, रफीकभाई खान अन्नछत्र मंडळ, शिरवळ, कमानपीर बाबा दर्गाह अन्नछत्र मंडळ, शिरवळ व अंबिका माता अन्नछत्र मंडळ शिरवळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास शिरवळ व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.छायाताई जावळे व नितीन कदम यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष मा.युवराज खुंटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, महेश जावळे, शरद खुंटे, स्वप्निल बनसोडे, अमोल डोळस, सचिन वाघमारे, श्रीकांत बनसोडे, प्रविण जावळे, कांतीलाल खुंटे, सुनिल खुंटे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



