कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज…! पोलीस अधिकारी वृषाली अशोक देसाई वाढदिवस विशेष.
संभाजी पुरीगोसावी पुणे जिल्हा
पोलीस उपनिरीक्षक वृषाली अशोक देसाई या धडाडीचे काम करत असून पुरुषांच्या बरोबरीने काम करणे अवघड नाही हे सिद्ध केले आहे, महिला पोलीस आपल्या शिक्षणाचा आणि अंगभूत कौशल्यांचा पोलीस खात्यात प्रवेश करून उपयोग करून शकतात यांचा प्रेरणादायी मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच… कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या ठरत आहेत, यामुळेच सध्या महिला मोठ्या संख्येने पोलीस दलात दाखल होत असताना चांगल्याच दिसून येत आहेत, या महिला आपल्या कर्तुत्वाने पोलीस दलाचे नाव तर उंचावतीलच,पण समाजाची मानसिकताही बदलतील हे नक्कीच… कर्तव्यदक्ष आणि गुन्हेगारांची कर्दनकाळ म्हणून ओळखीत असणाऱ्या पोलीस अधिकारी वृषाली अशोक देसाई यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा, त्या अनुषंगाने पोलीस महसूल राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक अशा विविध संस्थांतून शुभेच्छांचा वर्षाव, पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक वृषाली अशोक देसाई या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यांतील असून आई सौ. प्रगती देसाई व वडील अशोक देसाई या दांपत्याच्या पोटी वृषाली देसाई यांचा जन्म झाला, आई गृहिणी इतर वडील बीएसएनएल भारत संचार निगम लिमिटेड येथे शासकीय नोकरीत होते, ( लहानपणापासूनच ठेवली होती जिद्द ) वृषाली देसाई या लढवय्या व जिद्दी होत्या, आपले चांगले शिक्षण घेवुन शासकीय सेवेत जाण्याची जिद्द त्यांनी चांगलीच मनात ठेवली होती वृषाली देसाई यांना खाकी सेवेची आवड होती, घरात कोणीतरी पोलीस अधिकारी झाले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती, त्यांनी नेहमीच खाकी वर्दीसाठी ठेवलेली जिद्द आणि तितकाच अभ्यास करून आपल्या पहिल्याच प्रयत्नात 2014 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ट्रेनिंगसाठी घर सोडून नाशिक येथे गेल्या होत्या, पहिल्यांदाच सातारा जिल्हा पोलीस दलात नियुक्ती होताच आपले कर्तव्य पूर्ण क्षमतेने बजावले सुरुवातीला फलटण ग्रामीण सातारा तालुका शिरवळ पोलीस स्टेशन येथे कर्तव्य बजवताना वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले होते, पोलीस दलात आल्यावर आपल्याला चांगले वातावरण उपलब्ध होईल का, महिला म्हणून समस्या येतील का अशा शंका त्यांच्या मनात होत्या परंतु महिलांसाठी पोलीस दल हे खूपच चागले आहे, पोलीस खात्यात नोकरी करतानाही सरकारी कर्तव्याबरोबरच समाजसेवा ही करण्याची संधी मिळत आहे, अशा या खाकी वर्दीतल्या आणि गुन्हेगारांची कर्दनकाळ म्हणून ओळखीत असणाऱ्या धडाकेबाज लेडी सिंघम वृषाली देसाई मॅडम यांना समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र परिवाराकडूंन वाढदिवसांच्या हार्दिंक हार्दिंक शुभेच्छा,*

 
			

 
					 
							 
							