परमपूज्य विश्वचैतन्य नारायणपूरचे सद्गुरू नारायण महाराज (अण्णा) यांचे निधन,
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
संभाजी पुरीगोसावी
दि. १० सासवड : श्री क्षेत्र. नारायणपूर (ता. पुरंदर) येथील भाविकांचे श्रद्धास्थान परमपूज्य विश्वचैतन्य श्री. सद्गुरू नारायण महाराज (अण्णा) यांचे सोमवारी (दि.९) रात्री ११ वाजेच्या सुमारांस निधंन झाले आहे, मंगळवार ( दि.१० ) श्री. क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी नारायण अण्णा महाराज यांचे पार्थिंव अंत्यदर्शनासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे, दुपारी ३ वाजता मंदिरांतून अंत्य संस्कारांसाठी ठीक अंत्ययात्रा निघेल ४ वाजता यज्ञ कुंडाजवळ अग्नी संस्कार होतील, शिवदल नाम २०० कोटी यज्ञकुंड श्री. क्षेत्र नारायणपूर येथे हा विधी होणार आहे, परमपूज्य विश्वचैतन्य नारायण महाराज (अण्णा ) महाराज यांचे सोमवारी रात्री दीर्घ आजारांने दुःखद निधंन झाले आहे, ते विविध समाज कार्यात नेहमीच अग्रेसर होते, सामुदायिक विवाह सोहळ्याला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले होते, गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमांतून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ,सामुदायिक शेती व श्रमदानाचे उपक्रम राबविले होते, त्यांनी भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले होते, पुणे जिल्ह्यातील सासवड पुरंदर तालुक्यांतील त्यापैकीच एक श्रद्धास्थान श्री. क्षेत्र नारायणपूरची ओळख आहे,


