राजगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; देशी विदेशी दारू सह ३,८५,५२५ हजाराचा मुद्देमाल गाडीसह पकडला.


 

दि.११ खेड शिवापूर : राजगड पोलिसांन खेड शिवापूर येथील सरकारी दवाखान्याजवळ एका चारचाकी वाहनातून विनापरवाना देशी विदेशी दारू ३८५५२५ हजाराचा मुद्देमाल गाडीसह पकडण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विजय भीमराव राठोड वय २५ वर्ष चार चाकी वाहन (क्रमांक एम एच१२ केपी ०५३५ ) या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली. या वाहनात १३५५२५ रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. २५०००० किमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची पिकअप चार चाकी वाहन असा एकूण ३८५५२५ हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय भीमराव राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, राजेंद्र गव्हाणे, प्रमिला निकम,अजिज मिस्त्री या पथकाने केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!