विंग येथे ड्रायडे दिवशी १३,२३,८३४ /- रु. विदेशी दारू जप्त करुन ४ इसमांवर कारवाई.


 

सातारा प्रतिनीधी

समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांचे जयंती निमित्त सातारा जिल्हयामध्ये दारु विक्रिस बंदी (ड्रायडे) असल्याने अशी विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांच्या कारवाई करण्याच्या सूचना अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे कारवाई करण्याकरीता अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. दिनांक १४/४/२०२४ रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विंग ता.कराड जि.सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी चोरटी दारुची विक्री चालू आहे. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी
सपोनि पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखालील पथकास सदर ठिकाणी जावून छापा कारवाई करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सपोनि सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने आज दिनांक १४/४/२०२४ रोजी शिंदेवाडी विंग ता. कराड जि.सातारा येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी दुपारी छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क पथक कराड यांचेसह कारवाई केली असून सदर ठिकाणी हॉटेल मालकाच्या सांगण्याप्रमाणे ३ इसम मा. जिल्हाधिकारी सो, सातारा यांचे दारु विक्री बंदी आदेशाचा भंग करुन विदेशी दारुची विक्री करीत असताना मिळून आले असून त्यांच्या कब्जात विदेशी दारु रॉयल स्टॅग, रॉमॅनो वोडका, व्हाईट मिसचिफ, डी. एस. पी. ब्लॅक, डॉ. अँडी, ब्लेंडर प्राईड मॅकडॉवेल नं. १ अशा वेगवेगळया कंपनीचा १३.११.२०४/- रुपयेचा विदेशी दारुचा माल व रोख रक्कम १२,६३०/- रुपये असा एकुण १३,२३,८३४/- रुपयेचा माल
मिळून आला असून सदर इसमांवर कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची
प्रकिया सुरु आहे.

ADVERTISEMENT

आरोपी नावे

१) आनंदा सोपान माने वय ४३ रा पापर्डे ता पाटण जि सातारा
२) अक्षय आप्पासो वाघमारे वय २५ रा विंग ता कराड जि सातारा
३) रणजित दिनकर काटे वय २८ रा तडवळे ता बत्तीस शिराळा जि सांगली
४) अजित नागेश खबाले वय ५० रा विंग ता कराड जि सातारा(मालक हॅाटेल रॅायल लॅन्डस्केप.)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!