भोर तालुका शिवसेनेची आढावा बैठक संपन्न – तालुकाप्रमुख दशरथ गोळेंचा नेतृत्वाचा निर्धार
मंगेश पवार
भोर :- तालुका शिवसेनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी प्रथम नव्याने नियुक्त तालुकाप्रमुखांचा जिल्हा संघटक माऊली शिंदे व उपजिल्हाप्रमुख शैलेश वालगुडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बैठकीस युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य बोरगे, युवा तालुका अधिकारी अनिकेत शिंदे, तालुका संघटक योगेश गाडे, महिला तालुका संघटिका निशाताई सपकाळ, उपतालुका संघटिका रूपाली पडवळ, प्रिया मांढरे, तसेच उपतालुकाप्रमुख श्रीकांत लिम्हण, निलेश मुजुमले, विजय भिलारे, संतोष पावगे, अक्षय सुतार, शंकर भोरडे, समीर गोगावले, बापू गोळे, अंकुश तुपे, संकेत भोरडे, संकेत साळुंखे, अक्षय साळुंखे, महेंद्र भोमे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा आढावा
बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात सर्व गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली. इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर झाली असून, यात अनिकेत शिंदे, आदित्य बोरगे, दशरथ गोळे, भरत नाना साळुंखे, एकनाथ तावरे यांची नावे पुढे आली.
विशेष म्हणजे, तालुकाप्रमुख दशरथ गोळे यांना सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास व पाठिंबा मिळत असून, त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार “प्रथम शिवसैनिकाला संधी” या भूमिकेवर शिक्कामोर्तब करत, निवडणुकीत पूर्ण ताकदीने भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दशरथ गोळे (तालुकाप्रमुख) : “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आहोत. विधानसभा पातळीवर भूतकाळात एकमेकांविरोधात असलेले सर्वच आता महायुतीत आहेत. त्यामुळे विरोधकांना टक्कर देत तालुक्यातील प्रश्नांवर आमची शिवसेना आघाडीवर आवाज उठवेल.”
भरत साळुंखे : “पंचायत समितीवर भगवा फडकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार.”
आदित्य बोरगे : “खासदारकीला सुप्रिया सुळे यांना, तर विधानसभेला थोपटे यांना मदत केली. आता महाविकास आघाडीने मशालीला मतदान करून पाठिंबा द्यावा.”
शैलेश वालगुडे : “संघटना मजबूत करण्याची गरज आहे. बूथ लेव्हलवर काम झाले तर विजय नक्कीच मिळेल.”
माऊली शिंदे : “ही निवडणूक सोपी नाही, परंतु संघटितपणे लढलो तर कठीणही नाही. पंचायत सोडतीनंतर आघाडीसोबत लढायचे की स्वतंत्र, याचा निर्णय होईल.”
अनिकेत शिंदे (युवासेना तालुका अधिकारी) : “वेळू-नसरापूर गटातून जिल्हा परिषदेत भगवा फडकविण्याचा निर्धार आहे.”
बैठकीत युवासेना, शिवसेना आणि महिला आघाडीचा मेळावा लवकरच घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेत शिवसेना भगवा फडकवेल असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


