बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मारुती खेडकर यांचे रोखठोक महाराष्ट्र ग्रुपतर्फे भव्य स्वागत
संपादक मंगेश पवार
बीड :सातारा जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यांमध्ये उत्कृष्ठ सेवा देत नागरिकांचा विश्वास संपादन करणारे आणि सध्या बीड जिल्हा पोलीस दलातील बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे आदरणीय प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मारुती खेडकर साहेब यांचे रोखठोक महाराष्ट्र ग्रुपतर्फे भव्य स्वागत करण्यात आले.
या स्वागत प्रसंगी रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे प्रमुख प्रतिनिधी संभाजी पुरी गोसावी उपस्थित होते. तसेच बीड जिल्ह्यातील नूतन प्रतिनिधी संगीता इंनकर मॅडम बीडकर यांनीही उपस्थित राहून खेडकर साहेबांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
खेडकर साहेबांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय व नागरिकाभिमुख कार्यशैलीमुळे पोलीस दलात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. सातारा जिल्ह्यात सेवा बजावत असताना त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्याच धर्तीवर आता बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातही ते तत्परतेने सेवा बजावत आहेत.

			
