कापूरहोळ गावात घरफोडीचा प्रयत्न – तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
मंगेश पवार
कापूरहोळ :-भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारास १ वाजता घरफोडी करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती राजगड पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद ठकसेन लोहार (वय ४४ वर्षे, व्यवसाय – सुतारकाम, रा. कापूरहोळ, ता. भोर) यांच्या घराच्या दरवाजे आणि खिडक्या उघडून चोरी करण्याचा प्रयत्न तीन जणांनी केला. घरामध्ये हालचाल झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी आरडाओरड केली असता, वस्तीतील लोक जागे होऊन गोळा झाले. त्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपींपैकी 1 प्रेम प्रभाकर जेधे (वय २० वर्षे, रा. कारी, ता. भोर) हा पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याच्याकडील मोटारसायकल (एमएच ११ केडब्ल्यू ४४०८) जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
1) प्रेम प्रभाकर जेधे (रा. कारी, ता. भोर, जि. पुणे)
2) तेजल करण जाधव (रा. पंढरपूर फाटा, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) – सदर महिलेविरुद्ध याआधीही राजगड पो.स्टे. गु.र.नं. 337/2025, BNS कलम 305 नुसार गुन्हा दाखल आहे.
3) सनी संतोश कोळी (रा. सारोळा, ता. भोर, जि. पुणे)
या घटनेचा तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा.मयूर निंबाळकर करीत आहे.


