शेतकऱ्याने विषारी औषध केले प्राशन, उपचारापूर्वीच मृत्यू भुईज पोलीस ठाण्यात नोंद.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील सुरुर गावातील पोळाचे चाहुर नावच्या शेतात दि. ३ मे रोजी दुपारी ४ वाजता सुरेश राऊ बुलूंगे वय ६४ यांनी विषारी औषध पिले. त्यांनी विषारी औषध पिल्याचे निदर्शनास येताच त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना औषधोपचारासाठी वाई येथी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याची तक्रार वैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे यांनी दि. ११ मे रोजी सायंकाळी ६.१९ मिनिटांनी भुईज पोलीस ठाण्यात दिली आहे. याचा तपास हवालदार कोलवडकर हे करत आहेत.


