पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयनगर (कराड) येथे महायुतीचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.
सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
सोमवार दि.८ एप्रिल, आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज कराड उत्तर व दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा विजयनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थित राहून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट केली असून जगात पाचव्या क्रमांकाची देशाची अर्थव्यवस्था झाली आहे. पुढील पाच वर्षात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आणण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने पुन्हा मा. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान व्हावेत यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याची आपली जबाबदारी आहे, असे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार साताऱ्यातून विजयी व्हावा यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने प्रयत्न करावा. सातारा लोकसभा मतदारसंघात सूक्ष्म पातळीवर नियोजन करून महायुतीचा उमेदवार विजयी करू, असा निर्धार मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी खासदार मा. छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार मा. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्रजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य मा. अतुलबाबा भोसले, भाजपचे प्रदेश सचिव मा. विक्रम पावसकर, मा. भरतनाना पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख मा. जयवंतराव शेलार, मा. विक्रमबाबा पाटणकर, मा. आनंदरावनाना पाटील, मा. संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


