फलटण तालुक्यातील निंभोरे गावात सख्ख्या बहिण भावाचा खून.
फलटण प्रतिनिधी : तालुक्यातील निंभोरे गावच्या हद्दीत पालखी महामार्ग लगत उड्डाणपूल शेजारी दोघा बहिण भावाचा खून झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सिकाबाई शिंदे वय ३२ आणि सुमित शिंदे वय १५ असे खून झालेल्या सख्या बहिणीचे व भावाचे नाव आहे. ज्यांचा खून झाला ते पारधी समाजाचे आहे. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
हा खून कोणी केला व कशासाठी केला याचा अधिक तपास फलटण पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

