वेळे येथे कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.
वाई प्रतिनीधी : आशिष चव्हाण
वेळे येथे डोक्यात कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर भुईंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले होते या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.७ रोजी दुपारी ३:३० वा. सुमारास वाई तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत गुळूंब फाटा येथे व सायंकाळी गुळूंब गावच्या हद्दीत पंचतारा बंगल्या समोर सार्वजनिक रोडवर वेदांत यादव वय २२ फिर्यादी याचा मित्र प्रतीक यादव हा रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गुळुंब फाटा येथे त्याने अप्लवयीन मुलांना तू का हसतोय असे विचारले या कारणावरून अल्पवयीन मुलाने परशुराम जाधव यास फोन करून बोलवून घेतले त्या दोघांनी प्रतिक ला मारहान केली त्यानंतर जखमी प्रतीक, वेदांत यादव व गौरव संकपाळ हे तिघे दुचाकीवरून उपचारासाठी दवाखान्यात जात असताना परशुराम जाधव आणि अल्पवयीन मुलाने रस्त्यात अडवले त्या दोघांनी जिवे मारण्याचे धमकी देत कोयत्याने वार केला त्यात प्रतीक च्या डोक्याला गंभीर दुखतात झाली असून उपचार सुरू आहेत याप्रकरणी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास विशाल भंडारे करीत आहेत.


