कोढंवली येथे अवैध लाकुड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
कोढंवली येथे अवैध लाकुड वाहतुक प्रकरणी वनविभागाने केली कारवाई सविस्तर माहिती अशी की दि.०७/०४/२०२४ रोजी वाशिवली परिमंडळात वन कर्मचारी गस्ती वर असता मौजे कोढंवली शिवारत वृक्षतोड करून रामचंद्र पवार नावाचा इसम रायवळ जातीच्या वृक्षतोड करून वाहन क्र. एम.एच.०४ बी.यु.५५८८विना परवाना, लाकुड वाहतुक करत असता वाहन मिळून आले त्यावर भारतीय वन अधिनिअन १९२७चे कलम ४१,२ ब अन्वये गुन्हा नोंद केला असुन सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा अदिती भारद्वाज, सहा .वनसंरक्षक एम.एस झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल वाई स्नेहल मगर, वनपाल व्याहळी एम.बी. शिंदे, वनरक्षक जांभळी-बी.बी.मराडे , वनरक्षक गोळेवाडी-डी.एम.जानकर, वनरक्षक जोर- कुमार खराडे यांनी पार पाडली.


