लोणंद पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई., घरफोडी व मोटार सायकली चोरी करणारे सराईत चोरटे केले जेरबंद
दिनांक 24/08/2025 रोजी लोणंद शहरातील माऊलीनगर येथील रहाते घरात प्रवेश करुन चोरी करुन चांदीचे साहित्य चोरुन नेले होते. गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी मा. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या.
सदर चोरीतील संशयित आरोपी हे लोणंद परिसरात असल्याची माहिती गोपणीय बातमीदाराकडुन मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले सहा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली साफळा रचुन संशयीत आरोपी रवि भास्कर पवार वय 28 वर्षे रा. सागर कॉलनी पाथरी ता. पाथरी जि. परभणी.अतुल आदमन शिंदे वय 30 वर्षे रा. पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा पकडले. यांना ताब्यात घेवुन अटक करुन तपासा दरम्यान विचारपुस करुन त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर संशयीत आरोपींकडुन लोणंद पोलीस स्टेशन भारती विध्यापिठ पो.स्टे. (पुणे श.) तसेच पुणे शहर हददीतील एकुण 7 मोटार सायकली सुमारे 4,07,500/- रुपये किंमतीच्या चोरी केल्या असल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन घरफोडीतील चांदीचे साहीत्य व मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत. नमुद आरोपींची वाढीव दिनांक 11/09/2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली असुन आणखी गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा. श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा.डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहीत हेगडे, सहा. पो. उपनिरीक्षक विजय पिसाळ, विष्णु धुमाळ, पोलीस हवालदार नितीन भोसले, राहुल मोरे, रतनसिंह सोनवलकर, सतिश दडस, बापुराव मदने, विठठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, जयवंत यादव, संजय चव्हाण, यांनी कारवाईत सहभाग घेतला असुन पोहवा राहुल मोरे हे गुन्हयाचा तपास करीत आहेत. सदर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे या चांगल्या कामगीरीबाबत सर्व स्थरावरुन कौतुकाची थाप मिळत आहे.