आनंददायी शनिवार अंतर्गत जि.प.शाळा:-न्हावी शाळेत आमरस-चपाती स्नेहभोजन


[

सारोळे :- शाळेचे पालक जीवन सोनवणे यांनी सध्या महाग असूनही देवगड हापूस 12 डझन आंबे विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजनासाठी दिले. विद्यार्थ्यांनी आंब्याच्या पेट्या पाहून आनंद व्यक्त केला.

पिकलेले आंबे- सुगंध, खराब आंबे-दुर्गंध, आमरस करण्याची कृती, प्रत्यक्ष अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांनी घेतले.

आमरसातील दूध,साखर हे प्रमाण विद्यार्थ्यांनी अनुभवले.निवडक पालकांच्या सोबतीने विद्यार्थ्यांनी आमरसावर येथेच्छ ताव मारला.

ADVERTISEMENT

मिळालेली आंब्याची कोय शेतात परसबागेत लावण्यासाठी मुलांना सुकलेनंतर देण्यात येणार आहे.वर्षातून दोन वेळा आंबे देणारी रोपे आपल्या शेतात वृक्षारोपण करावीत याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी अरुण सोनवणे, जयदीप चव्हाण,नामदेव चव्हाण,शशिकांत चव्हाण,मच्छिंद्र बोंद्रे,दीपक सोनवणे, अमोल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमरस बनवण्यासाठी रूपाली पिसाळ,पूनम सोनवणे,सोनाली बोंद्रे, उर्मिला भुतकर,अनिल चाचर यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!