बंदुकीचा धाक दाखवून वाई येथे सराफाच्या दुकानावर दरोडा 


वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

 

वाई येथे कोयता आणि पिस्तुलचा धाक दाखवून दोन तरुणांनी लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले आहेत. ही घटना लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये घडली. किती माल गेला याची खबर घेण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी यांनीं घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक्षक समीर शेख, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शामसुंदर सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. चोरट्यांचा कसून शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे . रात्री साडेनऊच्या दरम्यान फक्त पंधरा ते सतरा मिनिटात दोन कारागिरांच्या दुकानावर दरोडा टाकून चोरट्यांनी लाखोंचा माल पळवला याबाबतची नक्की किती रुपयांचा माल पळवला याची माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत ठसे तज्ञ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी व तळ ठोकून होते. गुन्हे प्रकटीकरणात विभागाचे अधिकारी तपासात च्या अनुषंगाने यंत्रणा कामाला लावली आहे. लवकरच आरोपी मिळून येतील असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. पोलीस व्यापाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायचे काम रात्रभर सुरू होते. ही प्राथमिक माहिती आहे*.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!