लोणंद शहरात माल ट्रक धडकेत पादचारी ईसम जागेस ठार.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील पुणे सातारा रोडवर शास्त्री चौकात माल ट्रकने चिरडल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 29 जुलै रोजी झाली आहे शास्त्री चौक हा गजबजलेला चौक असल्याने पुणे सातारा व लोणंद खंडाळा रस्त्यावर वाहतूक सुरू असते आज रोजी दुपारी चारच्या सुमारास सातारला जाणाऱ्या माल ट्रक नंबर एम एच 18 जीबी 4986 ने पायी जाणाऱ्या संपत लक्ष्मण ठोंबरे राहणार कोपर्डे तालुका खंडाळा यास चिरडल्याने जागीच ठार झाले घटनास्थळी लोणंद पोलीस तातडीने हजर झाले आणि तपास सुरू झाला अधिक तपास सपोनी सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणे करीत आहेत


