आंदोलन केले म्हणून नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत खालच्या पातळीचे असविधानिक विधाने केली ते खरेच सेवक आहेत का? शैलजा खरात
उपसंपादक :दिलीप वाघमारे
लोणंद बस स्थानकांच्या दुरावस्थे बद्दल राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने बस स्थानका मध्ये बोटी सोडून दि २९ रोजी आंदोलन करण्यात आले. जनहितांचा प्रश्न मांडल्यानंतर लोणंद नगरपंचायत मधील नगरसेवक यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये खालच्या पातळीचे असंविधानिक विधाने करुन आपण लोणंद नगरीचे सेवक खरेच आहात का? हा प्रश्न लोणंद मधील जनतेला पडला आहे. वास्तविक पाहाता या बस स्थानकांच्या दूर अवस्थेमुळे लोणंदच्या बाजरपेठेवरती विपरीत परिणाम होत आहे. प्रवासी, महिला, विद्यार्थी, विद्यार्थीनी व जेष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड असतोष निर्माण झालेला आहे. अंदोलनांच्या वेळी सामान्य नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रीयांच्या दिल्या आहेत.

लोणंद मधील नगरसेवकांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना महिला प्रदेश सचिव श्रीम. शैलेजा खरात यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मा. मुख्यमंत्री यांनी निधीला मंजूरी देऊन एक वर्षे होत आले तरी सुद्धा बस स्थानकांची दूरअवस्था, प्रवाशी नागरिकांची हालअपेष्टा चालुच आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले परिवहन महामंडळाच्या विरोधात अंदोलन केले होते याचा नगरपंचायतीचा संबंध काय? विनाकारण डॉ. नितीन सावंत यांची बदणामी करण्यासाठी खालच्या पातळीची विधाने एका नगरसेवकाकडून कोणाच्या सांगण्यावरुन केली गेली हे समजण्या इतकी लोणंदची जनता सुज्ञ आहे. जनतेच्या अपेक्षा होत्या नगरसेवकाची जबाबदारी समजून या अंदोलनाला त्यांनी पाठिबा दयाला हवा होता. सामान्य जनतेच्या व्यथा मांडण्यात चुक काय आहे. का? यामध्ये कुणाचे हितसंबंध गुतले आहेत का? अशी चर्चा लोणंद नगरीमध्ये होत आहे.
राजूभाई इनामदार यांनी शिवाजीराव शेळके पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना त्यांनी प्रश्न विचारला की कुणाची लायकीची भाषा करण्यापेक्षा तुमच्या प्रभाग 1 मधून नगरसेवक का निवडून आणता आला नाही. डॉ. सावंत यांनी कोवीड काळातील केलेल्या सामाजिक कामामुळे आपण सत्तेच्या खुर्चीवर बसलात याचा विसर पडू देऊ नका आणि इतकाच आत्मविश्वास असे तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा मग कळेल जनता कुणा सोबत आहे. लोकशाही मध्ये कोणतीही निवडणूक कोणीही लढवायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.
स्वप्नील क्षीरसागर यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या विधानाचा तीव्र शब्दात विरोध केला आणि मागच्यादाराने नगसेवक झालेल्यानी डॉ. नितीन सावंत यांच्यावर बोलू नये. खरे तर स्वीकृत पदासाठी माळी समाजाचा हक्क होता. समाजाचे जेष्ठ नेते एन.डी. आण्णा क्षीरसागर, नगराध्यक्षा निवडून देणारे कुर्णे शहर अध्यक्ष पदी असलेले विनोद क्षीरसागर यांचा स्वीकृत
सदस्य म्हणून निवडून जाण्याचा अधिकार डावलण्यात आला. समाजाला फक्त मतासाठी वापरण्यांना येणा-या विधानसभेच्या निवडणूकीत जागा दाखवल्याशिवाय राहाणार नाही.
डॉ. सावंत,किसन धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ग्रामपंचायत ७-० अशी निवडून आली आहे. असे मा. उपसरपंच, बाळूपाटलाचीवाडी अमोल यादव यांनी सांगितले. पाडेगाव सोसायटी सभासद तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल धायगुडे यांनी शिवाजीराव शेळके पाटील यांना पाडेगावला तुच्छ लेखल्याबद्दल जाब विचारला. आमच्या येथे बिनविरोध निवडणूक होतात. तुमच्या सारखे स्वतःच्या पॅनेल मधील लोकांची पाडा-पाडी करुन घात केला जात नाही.



