खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांची महा ई सुविधा केंद्रास भेटी! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
उपसंपादक : दिलीप वाघमारे
जनसामान्यांचे लोकप्रिय असलेले कर्तव्यदक्ष तहसीलदारश्री.अजित पाटील यांनी कार्यक्षेत्रातील तलाठी यांच्यासमवेत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे ई- केवायसी पूर्ण करण्याच्यासंदर्भात खंडाळा विभागतील विविध गावांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने ई -केवायसी पूर्ण करण्यासाठी आवाहन केले. त्यासंदर्भात ई. के वाय सी पूर्ण करण्यासाठी महा ई सेवा केंद्राना भेटी देऊन सूचना दिल्या.जेणेकरून कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लावता येतील.
अतिवृष्टी, दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करून शेतकऱ्यांना फायदे होवेत आणि पैसे योग्य रिसिव्हरकडे जातील याची खात्री करण्यासाठी केवायसी केली जाते.
दरम्यान पाडळी येथील सेतू केंद्रास भेट दिली .मा तहसीलदार साहेब यांनी जिल्हा परिषदेच्या पाडळी शाळेतील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मा. सरपंच रामचंद्र धायगुडे,उपसरपंच दीपक धायगुडे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास धायगुडे, दीपक दीक्षित, निलेश वाघमारे,रणधीश धायगुडे, अक्षय धायगुडे, नागेश ननवरे, संजय मदने,मुख्याध्यापक अनिरुद्ध जाधव, कृष्णा रासकर, विशाल गिरी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते


